शालेय मुलांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी अर्चना फाउंडेशन कडून मिलाग्रीस हायस्कूलला फिल्टर प्लांट भेट.

0
34

सावंतवाडी,दि.०२ : मिलाग्रीस हायस्कूल व प्री प्रायमरी स्कूल सावंतवाडी येथे अर्चना फाउंडेशनच्या वतीने फिल्टर प्लांट बसवून देण्यात आला. शालेय मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, शुद्ध पाणी मिळावे यासाठी हा प्लांट बसविण्यात आल्याचे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब म्हणाल्या.पावसाळी दिवसांत दुषित पाण्यापासून होणारे आजार, रोगराई यापासून शालेय विद्यार्थ्यांच रक्षण व्हावे यासाठी फिल्टर प्लांट अर्चना फाउंडेशच्या वतीने भेट स्वरूपात देण्यात आला. मुलांचे आरोग्य सुदृढ रहावे, ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचे आपण देणे लागतो. शाळेला मदत करणे कर्तव्य आहे या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अर्चना घारे यांनी स्पष्ट केले‌‌.याप्रसंगी मिलाग्रीस हायस्कूलचे फादर रिचर्ड सालदाना, हिदयतुल्ला खान, विद्यार्थी अध्यक्ष ह्रतिक परब, इलियास आगा, तौसिफ आगा, पूजा दळवी, नॉबर्ट माडतीस, शिक्षक वर्ग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here