वेर्ले फौजदारवाडी रस्ता डांबरीकरणाचा जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ..

0
50

सावंतवाडी,दि.१९: सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शिक्षणमंत्री ना. दिपकभाई केसरकर यांच्या शिफारशीनुसार सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले फौजदारवाडी रस्त्याचे डांबरीकरणाचे नुतनीकरण करण्यासाठी रु. २०.०० लाख निधी मंजूर केला असून, त्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रेमानंद देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, संजयगांधी निराधार समिती अध्यक्ष गजानन नाटेकर, वेर्ले सरपंच सौ. सुचिता राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, ग्रा.पं. सदस्य सौ. पल्लवी राणे, दिलीप राऊळ,बाळा गावडे, लाडजी राऊळ,चंद्रकांत राऊळ, सुनिल राऊळ,सुभाष राऊळ,सुरेश राऊळ,ज्ञानदेव लिंगवत, प्रितेष राऊळ,अब्जू सावंत, संदेश सोनुर्लेकर, एकनाथ हळदणकर, सदा कदम, आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here