जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले उद्घाटन..
सावंतवाडी,दि.०७ : शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालिन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कारकिर्दीत खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावातील मंजूर जलजीवन मिशन अंतर्गत कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
दरम्यान वेत्ये गावातील विविध मंजूर विकासकामांचा शुभारंभ माजी सभापती बाळा गावडे, तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत ४४,५३,३०० रू निधी, इन्सुली क्षेत्रफळ वेत्ये सोनुर्लि इजिमा ७६ रस्ता मजबुतीकरण २५,००,००० निधी (बजेट 21-22), इन्सुलि क्षेत्रफळ वेत्ये सोनुर्ली इ.जी.मा. 76 रस्ता मजबुतीकरण करणे. 22.00 लाख (जिल्हा नियोजन 21-22) नळयोजना दुरूस्ती करणे 2,00,000/- निधी, आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांनी खासदार विनायक राऊत यांचे आभार मानले.
यावेळी माजी सभापती रमेश गावकर, उपतालुकाप्रमुख आबा सावंत ,विभाग प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य सुनिल गावडे, सरपंच तथा युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, उपसरपंच शितल खांबल, शाखाप्रमुख शरद जाधव, सुरज जाधव संतोष गावडे, बाळु गावडे, गुरू गावकर, नरेंद्र मिठबावकर, स्नेहा मिठबावकर, गोविंद गावडे, पुंडलिक देऊलकर ,बाबु देऊलकर, राजेंद्र आंबेकर, मनोज पाटकर ,शेखर खांबल, सचिन गावडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते वेत्ये ग्रामस्थ उपस्थित होते.