Site icon Kokandarshan

वन्यप्राणी व माकडांचा त्वरीत बंदोबस्त करा..

शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांचे उपवनसंरक्षक श्री रेड्डी यांना निवेदन

सावंतवाडी दि.०२: सावंतवाडी तालुक्यातील माजगांव, चराठा, कोलगांव तसेच सावंतवाडी शहरामध्ये मोठया प्रमाणात माकडांपासुन उपद्रव चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नारळ, केळी, शेती पिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

त्याचबरोबर भातशेती व इतर पिकांचेही गवारेडे व अन्य वन्य प्राण्यांपासुनही नुकसान होत आहे. याबाबतीत शासन स्तरावर शेतकऱ्यांना योग्य आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही. ही वस्तुस्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

याचा गांभिर्याने विचार करुन तालुक्यातील गावांमध्ये होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या व माकडांच्या उपद्रवाचा योग्य तो बंदोबस्त करण्याबाबत कार्यवाही व्हावी. अशाप्रकारचे लेखी निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी उपवनसंरक्षक श्री रेड्डी यांना दिले.

यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, संजयगांधी निराधार समिती अध्यक्ष गजानन नाटेकर, शहर शिवसेना प्रमुख खेमराज ऊर्फ बाबु कुडतरकर, संजय माजगांवकर, बापु कोठावळे, राजन परब, संजय गावडे, एकनाथ हळदणकर आधी उपस्थित होते.

Exit mobile version