उबाठा सेनेचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व दोन ग्रा.पं. सदस्यांचा भाजपात प्रवेश
वैभववाडी,दि.०६ : तालुक्यातील नानिवडे येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख दीपक साळवी, उपशाखाप्रमुख संतोष महाजन, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण साळवी, ग्रामपंचायत सदस्या प्रभावती महाजन यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुरेश साळवी, भिकाजी साळवी, तुकाराम गावडे, ऋषिकेश जाधव, बाळकृष्ण गोरूले, सखाराम शिवगण, प्रकाश महाजन, गोविंद वाडेकर, सार्थक महाजन व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांनी उबाठा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.
भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्यां सर्व पदाधिकाऱ्यांचा योग्य प्रकारे मान सन्मान केला जाईल असा विश्वास सर्वांना दिला.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत असून उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेशाचे इंनमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, राजेंद्र राणे, सचिन महाजन व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.