सावंतवाडी,दि.२९: काँग्रेसची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची सभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचा विधानसभा उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी मंगळवारी सकाळी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे नियोजन आयोगाचे माजी सदस्य माजी खासदार भालचंद्र मुणगेकर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी बोलताना हुसेन दलवाई म्हणाले की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसला उमेदवारी मिळाली नसली तरी आघाडीचा धर्म पाळून आपण महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचा असेल त्यामुळे भविष्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगले दिवस येतील. एकजूटीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करा.
भालचंद्र मुणगेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रत आल्यावर लाडक्या बहिणीना दोन हजार रुपये दिले जातील. तीस हजार रुपया पर्यंत मोफत आरोग्य वीमा दिला जाईल. तीन लाखा पर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल. अशा अनेक चांगल्यागोष्टी महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आल्यावर करण्याचा संकल्प केला आहे म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा.
सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी या सभेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावडे, प्रांतिक सदस्य अॅड. दिलीप नार्वेकर, दादा परब, जिल्हा सरचिटणीस रविंद्र म्हापसेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, बाळा धाऊसकर,विभावरी सुकी, अमिदी मेस्त्री,माया चिटणीस, सुमेधा सावंत, स्मीता तिळवे, शिवा गावडे, अॅड. गुरुनाथ आईर, रुपेश आईर, अशोक राऊळ, आनंद परूळेकर, प्रकाश डिचोलकर, अभय मालवणकर, बाळासाहेब नंद्दीहळ्ळी, संजय लाड, बाळू परब, संदिप सुकी, अमोल राऊळ, चंद्रकांत राणे, सुधीर मल्हार, उत्तम चव्हाण, रावजी परब, बाबू गवस, बबन डिसोजा आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सभा संपल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या रॅलीत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले.