यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांना सुपारी आणि काजूच्या कलमांचे वाटप..
सावंतवाडी,दि .१७ : येथील विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताह अंतर्गत काल १६ ऑगस्ट पासून कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून जनसंपर्क यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. या संपर्क यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
आज माजगाव व तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात संपर्क यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोनुर्ली,ओटवणे, तळवडे,आणि मळगाव येथे उबाठा शिवसेनेच्या वतीने उपस्थित शिवसैनिक आणि ग्रामस्थांना सुपारी आणि काजूच्या कलमांचे वाटप करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री केसरकरांवर कडाडून टीका केली.
सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील तब्बल १५ वर्षे आमदार असलेले व त्यातील साडेसात वर्ष मंत्रीपद उपभोगलेले आमदार दीपक केसरकर यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला आहे. येथील जनतेला विकासापासून वंचित ठेवून त्यांनी जनतेच्या भावनांना तिलांजली दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने निवडून द्यावे व खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला साथ द्यावी,असे आवाहन श्री राऊळ यांनी उपस्थितांना केले.
यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक, बाळा गावडे,तालुका संघटक.मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, कौस्तुभ गावडे,महीला संघटिका सौ.सुकन्या नरसुले,महिला तालुका संघटक झारापकर,विभाग प्रमुख विनोद काजरेकर,उपविभाग प्रमुख. प्रशांत बुगडे,जेष्ठ शिवसैनिक अशोक परब,उपतालुका प्रमुख, संदिप पांढरे,शाखाप्रमुख ,संदिप बाईत,युवासेना विभाग प्रमुख ,रोहन मल्हार,ग्रामपंचायत सदस्य ,दशरथ मल्हार
कार्यकर्ते, सुभाष मयेकर,दशरथ पेडणेकर,सतिष वारंग,रविंद्र नाईक,सुभाष बांदिवडेकर,बाळकृष्ण वारंग,सचिन बाईत,सुनिल मल्हार,,प्रमोद पेडणेकर,दादा तानावडे,नारायण भाईडकर,प्रसाद पालकर,पपी भाईडकर, अनंत कोनापालकर,विलास पालकर,नाथा जाधव,गणपत जाधव, गजानन जाधव,बबन जाधव,मधुकर जाधव,गुंडु जाधव,
काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र म्हापसेकर, भारती कासार, श्रीमती कासार, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर, बाळू परब, संजय गवस,शाखाप्रमुख नरेश मोरे, युवा सेना विभाग प्रमुख संदेश मडुरकर, अनिल गावकर, नामदेव गावकर, अनिता गावकर, आर्वी गोसावी, बाबी धडाम, सोमा धडाम, सरस्वती धुरी, रुक्मिणी राऊळ, निलेश मोर्ये, संकेत गावकर, बापू मोर्ये, मारुती म्हापसेकर, सुरेश गावकर,तिळबा जाधव, उत्तम नाईक, धोंडीबा गावकर, महादेव गावकर, मनोहर गावकर, माई मौर्ये, रामचंद्र गावकर, वैभवी गावकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनीही आपल्या मनोगतातून मंत्री केसरकरांवर जोरदार प्रहार केला व उपस्थितांना महाविकास आघाडीलाच साथ द्यावी, असे आवाहन केले.