सिंधुदुर्ग,दि.२३: महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाला राज्यभरातून हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्या कणकवली येथील “ओम गणेश” या निवासस्थानी भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पालकमंत्री नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी सभापती पंकज पेडणेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान मंत्री नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी उशिरापर्यंत त्यांच्या निवासस्थानी राणे समर्थकांनी मोठी गर्दी केली होत