Site icon Kokandarshan

सावंतवाडी आगाराचे चालक तथा वाहक धनराज लक्ष्मण कासार यांचा प्रामाणिकपणा

सावंतवाडी,दि .१५: पुणे सावंतवाडी गाडीवर आपले कर्तव्य बजावत असताना एका महिला प्रवाशाची बॅग गाडीमध्ये राहिली होती. त्या बॅगेत दोन लॅपटॉप व सहा हजार रुपये कॅश आणि मौल्यवान वस्तू ती बॅग प्रवाशाची संपर्क साधून कोल्हापूर स्थानक प्रमुख सचिन पाटील यांच्या समक्ष सावंतवाडी आगारचे चालक तथा वाहक धनराज लक्ष्मण कासार यांनी प्रामाणिकपणे परत केली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Exit mobile version