रक्तदाता दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर संपन्न
सावंतवाडी,दि.१५: “राज्यात रक्त न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचे मी पाहिले आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक रक्तदाते सामाजिक भान ठेवून कार्यरत आहेत आणि हे रक्तदातेच आपली खरी संपत्ती आहेत,” असे प्रतिपादन ऑनकॉल रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष तथा निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी केले. सावंतवाडी येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिर आणि रक्तदाता सन्मान सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
याप्रसंगी रक्तदान चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक ‘रक्तमित्रां’ना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यामध्ये पत्रकार सचिन रेडकर, निलेश मोरजकर, प्रा. रुपेश पाटील, सुभाष परुळेकर, जतिन भिसे, अमोल टेमकर, लुमा जाधव, राजू तावडे आणि विनायक गावस यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ऑनकॉल रक्तदाता संस्थेचे अमोल गोवेकर, सागर येराम, सखाराम नाईक, राहुल खरात, नितेश सावंत, आर्यन मयेकर, गौरेश गवंडी, श्रेयस राऊळ, मंगेश माणगावकर, सिद्धार्थ पराडकर, श्रीया माणगावकर, महेश रेमुळकर, सुहास राऊळ, स्वप्नील जाधव, गुंडू साटेलकर, प्रसाद परब आणि पंढरी सावंत यांचाही सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, १०८ वेळा रक्तदान करून शतकी विक्रम करणारे नॅब असोसिएशनचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांचा पत्रकार संघाकडून विशेष सत्कार करण्यात आला. हॉर्टीकल्चर कॉलेज ऑफ मुळदेच्या विद्यार्थिनींनी रक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग घेतला, त्यांचाही प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक रो. प्रमोद भागवत यांनी पत्रकारांच्या आरोग्य शिबिरानंतर आयोजित रक्तदान आणि दात्यांचा गौरव सोहळा कौतुकास्पद असल्याचे म्हटले. रोटरी कायम सामाजिक कार्यात सक्रिय राहील असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी रोटरी क्लबचे रो. राजू पनवेलकर, रो. दिलीप म्हापसेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, मोहन जाधव, राजेश मोंडकर, पत्रकार संघाचे सचिव विजय राऊत, उपाध्यक्ष हर्षवर्धन धारणकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गावस, प्रा. रुपेश पाटील, दीपक गावकर, रुपेश हिराप, निलेश मोरजकर, लुमा जाधव, जतिन भिसे, साबाजी परब, वासुदेव होडावडेकर, श्रेया निंबाळकर, प्रणाली गिम्हावणेकर, स्नेहल फडतरे, सिद्धी दिवेकर, प्राजक्ता चिंदरकर, नेहा मोरे, क्रिष्णाली पोल, वृक्षाली काळे, ईश्वरी राणे, शियाली थोरात, निकिता सोनटक्के, ज्ञानश्री पाटील, आरोही सावे, मनस्वी खामकर, सुनिल कोरगावकर, रामा वाडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश रेमुळकर यांनी केले, सूत्रसंचालन विनायक गावस यांनी केले, तर खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.