Site icon Kokandarshan

चौकुळ म्हाराठी बेरडकीवाडी येथील रस्त्याच्या कामाचे संदीप गावडे यांच्या हस्ते भूमिपूजन

सावंतवाडी,दि.०५: चौकुळ म्हाराठी बेरडकीवाडी येथील रस्त्याच्या कामाचे संदीप गावडे यांच्या हस्ते भूमिपूजन
मोठ्या उत्साहात पार पडले. यामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून, दळणवळणाची सोय मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे.
यावेळी चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, बूथ अध्यक्ष संतोष गावडे, बूथ अध्यक्ष सोमा गावडे, चौकुळ विकास सोसायटीचे चेअरमन पी. डी. गावडे, दयानंद गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आणि अनिकेत आसोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संदीप गावडे यांनी, “या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार असून, विकासाला गती मिळेल,” असे सांगितले. तसेच, या रस्त्याच्या कामामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, यामुळे परिसरातील शेतीमाल वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्याची सोय अधिक सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version