Site icon Kokandarshan

मान्सूनपूर्व पहिल्याच पावसात खेडेगावात विजेचा लपंडाव सुरूच..

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.. अमित राऊळ यांचा आरोप

सावंतवाडी,दि.२२: तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून पहिल्याच पावसात माडखोल ते शिरशिंगे या दशक्रोशीतील खेडेगावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला असता काम चालू आहे थोड्याच वेळात विद्युत पुरवठा सुरळीत होईल अशा प्रकारचे उत्तरे देण्यात येत आहेत मात्र विजेता लपंडाव सुरूच आहे. मान्सूनपूर्वी पहिल्याच पावसात वारंवार बत्ती गुल होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
येत्या दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास सावंतवाडी येथील वीज वितरण कार्यालयासमोर धडक देऊन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माडखोल धवडकी येथील सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

Exit mobile version