Site icon Kokandarshan

मोती तलावातील गाळाचा प्रश्न गंभीर, त्यामुळे रॅम्पची तरी उपाययोजना करा…

निधी उपलब्ध नसेल तर..लोकसहभागातून गाळ हटाव मोहीम राबविण्याचे पुंडलिक दळवी यांचे आवाहन…

सावंतवाडी,दि.०१ : मोती तलावाच्या कठड्याचे काम होणे गरजेचे आहे. परंतु त्यापेक्षाही गाळाचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे. त्यामुळे जनतेचा निधी वाया जावू नये, यासाठी पुढील नियोजन करून कठड्याचे काम करा, मात्र आवश्यक ठिकाणी रॅम्पची तरी बांधणी आत्ताच करून ठेवा, अशी मागणी आज येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून बांधकाम व पालिका तसेच प्रांताधिकारी प्रशासनाकडे करण्यात आली. दरम्यान गाळ काढण्याच्या कामाला मोठा खर्च आहे. तुर्तास त्यासाठी निधी नाही असे मुख्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले नगरपालिकेकडे पालिका प्रशासनाकडे निधी नसेल तर लोक वर्गणी व लोक सहभागातून गाळ काढण्याचे काम करावे अशी मागणी श्री दळवी यांनी केली.

Exit mobile version