Site icon Kokandarshan

शिरशिंगे मळईवाडी येथे शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..

सावंतवाडी,दि.३०: तालुक्यातील शिरशिंगे येथे १ मे महाराष्ट्र दिनाचे व शिवजयंतीचे औचित्य साधून राजे शिवाजी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ शिरशिंगे मळईवाडी यांच्यावतीने अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना गुरुवार दिनांक १ मे रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी आठ वाजता मूर्तीची प्रतिष्ठापना व विविध पूजन, सकाळी साडेनऊ वाजता शिव आरती व शिव घोषणा, सकाळी अकरा वाजता मळाईवाडी ते गोठेश्वर मंदिर गोठवेवाडी ते मळईवाडी शिव रॅलीचे आयोजन, दुपारी एक ते तीन दरम्यान शिव महाप्रसाद, संध्याकाळी चार ते सहा सांस्कृतिक कार्यक्रम फनी गेम्स, संध्याकाळी सात वाजता ग्रामस्थांचे भजन, संध्याकाळी साडेसात वाजता दीपोत्सव, व रात्री उशिरा नऊ वाजता मामा मोचेमाडकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यांचा दणदणीत “माय माऊली दत्त सावली” हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजे शिवाजी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ शिरशिंगे मळईवाडी यांनी केले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version