Site icon Kokandarshan

रेडी येथील द्विभुज गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ शुक्रवार १८ एप्रिल रोजी..

वेंगुर्ले,दि.१७: तालुक्यातील रेडी नागोळेवाडी येथील द्विभुज,नवसाला पावणारा तसेच जगप्रसिद्ध ख्याती असलेल्या गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ शुक्रवार दिनांक १८ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ६ वाजता अभिषेक, सकाळी ८ वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ८ वाजता स्थानिकांची भजने, रात्री ८ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव गजानन देवस्थान, रेडी नागोळेवाडी यांनी केले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version