Site icon Kokandarshan

सावंतवाडीत ४ रोजी “हितगुज मुलांशी संवाद पालकांची” या कार्यक्रमाचे आयोजन…

राकेश नेवगी मित्र मंडळ व अर्चना फाउंडेशन चे आयोजन

KOKAN DARSHAN Digital Media
कोकण एक स्वप्ननगरी

सावंतवाडी, दि.०१: राकेश नेवगी मित्र मंडळ व अर्चना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कळसुळकर इंग्लिश स्कूल व आय.बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथे मुलांच्या उज्वल भविष्यासाठी हितगुज मुलांशी संवाद पालकांची अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत अर्चना घारे परब यांनी दिली.
मुलांमध्ये होणारे वैचारिक बदल मुलांना आत्मविश्वास व अतिविश्वास यामधील अंतर सोशल मीडिया व आपल्या आयुष्य यामधील फरक मोबाईल चे शारीरिक मानसिक व स्वाभाविक दुष्परिणाम अशा विविध विषयांवर प्रमुख वक्ते श्री नवीद हेरेकर हे मोफत मार्गदर्शन आणि पालकांशी मुक्त संवाद साधणार आहेत.
पालकांनी आपल्या मुलांना या कार्यक्रमासाठी घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन राकेश नवगी मित्र मंडळ व अर्चना फाउंडेशन यांनी केले आहे.

यावेळी नरेश जिवणे,सिद्धेश किनळेकर, सायली दुभाशी,चित्रा बाबर देसाई, नविद हरेकर आदी उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version