कोकण दर्शन मीडियाचा “इम्पॅक्ट” व सरपंच,पोलीस पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
सावंतवाडी,दि.१३: शिरशिंगे गावात गवारेड्याचा असलेला वावर व त्यांपासून हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांना मदत यासाठी कोकण दर्शन मीडियाद्वारे आवाज उठविल्यानंतर आणि गावातील सरपंच व पोलीस पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर वनविभागाने आपल्या रेस्क्यू टिम व गावातील तरुणांच्या मदतीने गव्या रेड्याची शोध मोहीम राबवून त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेत शिरशिंगे गावाचे सरपंच दिपक राऊळ,पोलीस पाटील गणू राऊळ,आंबोली वनविभागाचे वनपाल श्री.नायकवडी,श्री.पाटील, शिरशिंगे वनरक्षक
श्री कलांगे,श्री.खोत,श्री.पाटील,श्री पारधी व इतर कर्मचारी तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देसाई,राजेंद्र सावरवाडकर,संजय राऊळ, भावेश राऊळ,सुरज राऊळ, राघवेंद्र राऊळ,ज्ञानदेव राऊळ,यश राऊळ,मंथन राऊळ,ललित राऊळ,राज राऊळ,फटू राऊळ असे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभागाने केलेल्या या कारवाई बद्दल वनविभाग अधिकारी व कर्मचारी तसेच कोकण दर्शन मिडिया यांचे शिरशिंगे गावाच्या वतीने सरपंच दिपक राऊळ,पोलीस पाटील गणू राऊळ आणि सर्व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.