Site icon Kokandarshan

साटेली भेडशीतील जळीतग्रस्त नाईक कुटुंबास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडून आर्थिक मदत..

दोडामार्ग,दि.१०: घरगुती सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घर जळालेल्या साटेली भेडशी येथील अंकिता अर्जुन नाईक यांच्या कुटुंबास शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व आम्ही तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस, सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका संघटक गोपाळ गवस, साटेली उपसरपंच सुमन डिंगणेकर, गणपत डिंगणेकर, नंदू टोपले आदी उपस्थित होते.
अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास साटेली भेडशी वरचा बाजार येथील अंकिता नाईक यांच्या घरी सिलिंडरचा मोठा स्फोट झाला होता. नगरपंचायतच्या अग्निशमक बंबाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीत बेचिराख झाले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच श्री. परब यांनी या कुटूंबाची भेट घेत आर्थिक मदत सुपूर्द केली.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version