Site icon Kokandarshan

शिरशिंगेत पुन्हा एका युवकावर “गवा” रेड्याचा हल्ला..

हल्ल्यात देऊळवाडीतील राघवेंद्र राऊळ गंभीर जखमी..सावंतवाडी,दि.०६: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शिरशिंगे येथे गवा रेड्याने थैमान घातला असून शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास राघवेंद्र संजय राऊळ वय वर्षे २६ या युवकावर शिरशिंगे कलंबिस्त सीमेलगत गव्याने हल्ला केला.

या हल्ल्यात राघवेंद्र याच्या खांद्याला

व पायाला जबर मार बसला. घटना स्थळी पोलीस पाटील गणू राऊळ यांनी धाव घेत जखमीला जवळील डॉ.लाड यांच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊन उपचार केले.
गेल्या चार दिवसातील गव्या च्या हल्ल्याची ही दुसरी घटना असून या रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.याबाबतची माहिती वनविभागाला समजल्यावर देवसू वानपाल एम.ए.नायकवडे,वनरक्षक सुधीर काळंगे यांनी यांनी राघवेंद्र राऊळ यांच्या घरी येऊन पंचनामा केला.

दरम्यान बोलतांना पोलीस पाटील गणू राऊळ यांनी वनपाल यांना गव्याचा तात्काळ बंदोबस्त करायला सांगितले.
दरम्यान बोलतांना वनपाल श्री नायकवडे यांनी आपण वरिष्ठांशी बोलून द्रोणच्या साहाय्याने पाहणी करून लवकरात लवकर त्या गव्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सरपंच दीपक राऊळ,पोलीस पाटील गणू राऊळ,पत्रकार आनंद धोंड, राजू राऊळ आदी उपस्थित होते.

Exit mobile version