Site icon Kokandarshan

शिरशिंगे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश…

मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहीन; संजू परब

सावंतवाडी,दि.०३: माजी मंत्री व आमदार दिपक केसरकर तसेच युवा नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या मार्फत आमच्या गावातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली. यापुढे आमच्या गावाचा विकास करण्याकरता आम्ही शिवसेनेसोबत आहोत असा निर्धार करीत शिरशिंगे गावचे ग्रामपंचायत सदस्य उबाठाचे ज्ञानदेव राऊळ, पंढरी राणे यांच्यासह राणेवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत बुधवारी प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या अनेक समस्या श्री. परब यांच्या पुढे मांडल्या. तुमच्या सर्व मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नंदू शिरोडकर, महिला संघटक सेजल लाड, माडखोल व कोलगाव उपतालुकाप्रमुख जीवन लाड, उज्वला नाईक, उज्वला राऊत, सुभेदार सुरेश घावरे मनोहर घावरे, प्रभाकर घावरे, नारायण घावरे, गंगाराम राऊळ, प्रकाश जाधव, महादेव जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. परब म्हणाले, विकास हा आमदारांशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे विकासासाठी आपल्याला दीपक भाईंना साथ दिली पाहिजे. तुमच्या पायवाटेचा प्रश्न येत्या मे महिन्यापर्यंत नक्कीच सोडवण्यात येईल. राजकारणासोबत सामाजिक कामही तितकंच महत्त्वाचं आहे. शिक्षणासाठी व आरोग्याच्या प्रश्नांसाठी मदत हवी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. मी शिंदे सेनेत आलो तेव्हा अनेक विकास कामे मार्गी लावणार तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असे मनात ठरवले. मी विजयी होणार या जिद्दीने उतरलो होतो. जिद्द असल्याशिवाय माणूस काहीही करू शकत नाही. तुम्हीही त्याच जिद्दीने शिंदेसेनेत या असे आवाहन यावेळी उपस्थितांना केले.
ते पुढे म्हणाले, तुम्ही शिंदे सेनेवर, आमदार दीपक केसरकर व माझ्यावर जो विश्वास ठेवून प्रवेश केला आहे तो विश्वास नक्कीच सार्थकी लावेन. तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य आहात, तुमचे कुटुंब हेच माझं कुटुंब समजून मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहीन असा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सुवर्णलता राणे, स्वरा राणे, संचिता राणे, आदित्य राणे, शैलेश राणे, रघुनाथ राणे, मनोज धोंड, सावित्री धोंड, दशरथ राऊळ, दर्शना राऊळ, लक्ष्मी राऊळ, राजेश राऊळ, उदय नाईक, उज्वला नाईक, कृष्णा नाईक, रुक्मिणी नाईक, कृष्णा घाडी, राजश्री घाडी, साबाजी राऊळ, रामदास घाडी, गोविंद घाडी, स्वप्निल सावंत, साहिल सावंत, सोमा मेस्त्री, गणपत मेस्त्री, दीपक मेस्त्री, समीर आमुणेकर, वंदना आमुणेकर, राधाबाई मोहिते, सायली मोहिते, सुरेश मोहिते, शैलेंद्र मोहिते, राजेश राऊळ, साहिल गवस, विशाल गवस, रोशन गवस, विनोद राणे, महादेव राणे आदींचा समावेश आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version