सावंतवाडी,दि.०२: गुढीपाडव्याचे औचित्य साधून शिरशिंगे येथील शिवशक्ती कला क्रीडा मंडळ परबवाडी या मंडळाने एस पी पी एल (SPPL) शिरशिंगे परबवाडी प्रीमियर लीग या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत सहा संघानी सहभाग घेतला होता.
सातेरी स्पार्टन्स आणि पावणाई इलेव्हन (११)यांच्यामध्ये अंतिम सामना रंगतदार झाला. अंतिम सामन्यात पावणाई इलेव्हन या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित तीन षटकात १८ धावा करत सातेरी स्पार्टन्स संघासमोर १९ धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र पावणाई इलेव्हन संघाने सातेरी स्पार्टन्स संघाला १८ धावात रोखल्याने सामना रंगतदार झाला. अखेर सुपर ओव्हर सामन्यात संघमालक सचिन धोंड व सुरज धोंड यांच्या सातेरी स्पार्टन्स संघाने हा सामना जिंकून स्पर्धेचा
महाविजेता संघ ठरला.
तर विशाल राऊळ, सिद्धेश राऊळ यांचा पावणाई इलेव्हन संघ
उपविजेता ठरला.
दरम्यान संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी,गोलंदाजी, क्षेत्ररक्षण केलेल्या सांगली येथील आयकॉन राजेश कदम या
खेळाडूला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज
सिद्धेश राऊळ तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून गणेश परब
तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कलंबिस्त येथील आयकॉन खेळाडू
अनिकेत राऊळ यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच दीपक राऊळ, माजी सरपंच पांडुरंग राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ,माजी सरपंच सुरेश शिर्के,भालचंद्र परब सत्यवान परब,विश्वनाथ परब, रघुनाथ परब, सुरेश परब,प्रकाश परब तुकाराम परब रवींद्र परब, गणपत राऊळ, कोकण दर्शन डिजिटल मीडियाचे संपादक आनंद धोंड, कोकण लाईव्ह चे पत्रकार नाना धोंड आदी मान्यवर उपस्थित होते.
परबवाडी येथील शिवशक्ती कला क्रीडा मंडळाच्या यशस्वी
आयोजनाने ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.