अखेर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री सावंत यांच्या यशस्वी शिष्टाईने उपोषण मागे..
सावंतवाडी,दि.०१: तालुक्यातील शिरशिंगे शाळा नं. २ ते गोठवेवाडी रस्ता मंजूर असूनही अद्यापही कामाची सुरुवात न झाल्याने व शिरशिंगे ते परबवाडी मळवाडी व गोठवेवाडी ला विद्युत पुरवठा करणारी इलेव्हन केव्ही लाईन रस्त्याच्या बाजूने नव्याने मंजुरी करण्याबाबत वारंवार संबंधित खात्याला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने आज गोठवेवाडी येथील ग्रामस्थांनी सावंतवाडी उपविभागीय (प्रांत) कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उपोषणाला भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला.
दरम्यान भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, महेश धुरी,यांच्या यशस्वी शिष्टाईने प्रांत अधिकारी श्री निकम यांनी संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना बोलवून
उपोषण स्थळी भेट दिली. व येत्या १५ एप्रिल पर्यंत उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी स्वरूपात पत्र दिले. त्यानंतर माजी सरपंच सुरेश शिर्के यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून उपोषण मागे घेतले.
यावेळी शिरशिंगे माजी सरपंच सुरेश शिर्के, सरपंच दीपक राऊळ,जीवन लाड, वसंत शिर्के, उत्तम शिर्के , बाळकृष्ण पेडणेकर, अनंत शिर्के, अनिल घावरे भाऊ पेडणेकर भगवान घावरे सुरेश घावरे विकास दळवी, वसंत घावरे सदाशिव घावरे आदी गोठवेवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.