Site icon Kokandarshan

कु.मिताली मिलिंद धुरी या विद्यार्थिनीचे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश..!

मिताली माणगाव सेंट जोसेफ नं ४ शाळेची विद्यार्थिनी

कुडाळ,दि.२५ : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम शिष्यवृत्ती २०२४-२५ या स्पर्धा परीक्षेत माणगाव सेंट जोसेफ नं. ४ केंद्र शाळेतील मिताली मिलिंद धुरी हिने तब्बल २४६ गुण मिळविले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी, यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

या परीक्षेसाठी मुख्याधिपिका सौ. स्नेहा पालकर, शिक्षिका सौ. दिपा सावंत, सहाय्यक शिक्षिका सौ. रेश्मा काळे यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.

गोठोस सारख्या छोट्याशा गावातून येऊन माणगाव येथे शिक्षण घेत असलेल्या मिताली धुरीचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version