सावंतवाडी,दि.२१: आनंद धोंड : राजकारण असो वा समाजकारण प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे सावंतवाडी नगरीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्यांनी शिवसेनेची संघटना मजबूत करताना आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला.
याचीच दखल घेत आमदार दीपक केसरकर यांनी वरिष्ठांच्या संमतीने त्यांच्यावर नुकतीच शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली.
संजू परब यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून केली या दरम्यान त्यांनी राणे कुटुंबीयांशी जवळीक साधत शाखाप्रमुख, युवक काँग्रेस जिल्हा प्रमुख,तालुकाप्रमुख जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा संघटक आणि आता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशी वेगवेगळी पदे भूषविली.
संजू परब हे आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक समजले जातात जिथे निलेश राणे तेथे संजू परब असे जणू समीकरणच झाले आहे.
संजू परब यांचे राजकारणातच नव्हे तर समाजकारणातही तेवढेच योगदान आहे.
त्यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात वेळोवेळी गरजूंना मदत केली आहे. त्यांच्याकडे एखादा माणूस आपली कैफियत घेऊन आला आणि ते संजू यांनी पूर्ण केली नाही असे कधीच घडले नाही.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या तालमीत शिकलेले संजू परब यांनी श्री राणेंप्रमाणे कार्यकर्ता कसा जपायचा याची कला आपसूकच अवगत केली आहे.
संजूभाई यांच्या या नवीन वाटचालीस कोकण दर्शन डिजिटल मीडिया कडून लाख – लाख शुभेच्छा…
सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..
शुभेच्छुक : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते..