संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाउंडेशनतर्फे वाढदिवस साजरा
सावंतवाडी,दि.१६ : ज्यांच्या रक्तातच समाजसेवा आहे त्या राणे कुटुंबांचे निलेश राणे एक सदस्य आहेत. १९९० पासून राणे साहेब जिल्ह्यात आल्यानंतर या जिल्ह्यात खूप मोठं परिवर्तन घडलं. राणे साहेबांनी कोकणासाठी जे काही केलं त्याची भरपाईच लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशातून सिद्ध झाली. त्यांच्यासोबतच आज त्यांची दोन्ही मुलं निलेश व नितेश त्यांचा समाजसेवेचा वसा जपत आहेत. आ. निलेश राणे हे सर्वसामान्यांचा आवाज असणारे नेतृत्व असून खासदार म्हणून त्यांनी खूप मोठं कार्य केलं होतं. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील अनेक रस्ते त्यांनी मंजूर केले. झाराप पत्रादेवी बायपास मार्गी लावला. आता आमदार म्हणूनही ते अत्यंत अभ्यासपूर्ण काम करत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो व याही पुढेही त्यांच्या हातून कोकण विकासाचं खूप मोठं कार्य घडो अशा शब्दांत माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांनी निलेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी संजू परब म्हणाले, गेली १५ वर्षे मी निलेश राणे यांच्यासोबत काम करीत आहे. बोलणारा शब्द पाळणारा, मैत्रीला जपणारा नेता, तरुणांचा आयडॉल असा आवडता नेता म्हणून निलेश राणे यांची ओळख आहे. आज प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन ते राज्यभर काम करीत आहेत. विधिमंडळात एक अभ्यासपूर्ण आमदार म्हणून त्यांनी छाप पाडली आहे. अशा नेत्याचा कार्यकर्ता म्हणून काम करताना निश्चितच अभिमान वाटतो. येणारा काळ हा निलेश राणे यांचाच असून भविष्यात मंत्री म्हणून ते आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी निश्चितच येतील, अशा शब्दांत संजू परब यांनी निलेश राणे यांना शुभेच्छा दिल्या.
संजू परब हे माझे जवळचे मित्र असून सामाजिक क्षेत्रात धडाडीने काम करणारं असं जनतेच्या मनातील नेतृत्व आहे. निलेश राणे यांना देवाप्रमाणे ते मानतात. साहेबांचा वाढदिवस दिमाखात साजरा करूया अशी इच्छा त्यांनी आमच्याकडे व्यक्त केली व त्यातूनच आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री फाउंडेशन व संजू परब मित्र मंडळाच्या माध्यमातून नाट्य महोत्सव आयोजित केला.
आ. निलेश राणे यांनी अधिवेशनात कोकणातील अनेक विषय अभ्यासपूर्ण व खंबीर पणे मांडले आहेत.सर्व सामान्यांचे अनेक प्रश्न ते मांडत आहेत. त्यामुळे भविष्यातही
निलेश राणेंकडून जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक अपेक्षा असून त्या निश्चितच पूर्ण होतील असा विश्वास यावेळी सुनील राऊळ यांनी व्यक्त केला.
शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले,
आ. निलेश राणे यांच्या रुपाने शिवसेनेत एक आक्रमक व अभ्यासू नेतृत्व म्हणून पुढे येत आहे. त्यांनी आपल्या जीवनात फार मोठा बदल केला असून भविष्यातील एक उमदं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. विधानसभेच्या सभागृहात त्यांनी मांडलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांची अनेकांनी दखल घेतली. देवबागसाठी कोट्यावधींचा निधी आणला.
आता तीन राणे व जोडीला केसरकर असल्याने जिल्हा सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही, अशा शब्दात त्यांनी निलेश राणे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी निलेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी, संतोष गांवस, ज्ञानेश्वर सावंत, क्लेटस फर्नांडीस, संदेश सोनुर्लेकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, परिक्षीत मांजरेकर, सुधा कवठणकर, दिनेश गावडे, सिताराम गावडे, भाजपच्या प्रदेश सदस्य तथा सावंतवाडी शहर महिला आघाडी प्रमुख मोहिनी मडगांवकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, सुशांत पांगम, झेवियर फर्नाडीस, दीनानाथ नाईक, प्रसन्ना शिरोडकर, प्रल्हाद तावडे, प्रताप परब, समीर पालव, संजय नाईक, प्रतीक बांदेकर, प्रवीण साठे, देव्या सूर्याजी, तात्या वेंगुर्लेकर, बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर, समीर पालव यांसह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.