Site icon Kokandarshan

व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग च्या वतीने जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांचा सन्मान..

सावंतवाडी,दि.११ : ‘ व्हॉईस ऑफ मीडिया’ जिल्हा सिंधुदुर्ग या संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार व सावंतवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक सीताराम गावडे यांना नुकताच महाराष्ट्र युवा फाऊंडेशनचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. श्री. गावडे यांच्या या निवडीबद्दल ‘व्हाईस ऑफ मीडिया’ जिल्हा सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कार्याध्यक्ष आनंद धोंड, सचिव शैलेश मयेकर, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, अमित पालव, खजिनदार आनंद कांडरकर, सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, सदस्य साबाजी परब आदि उपस्थित होते.

Exit mobile version