आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चा पुढाकार..कुडाळ,दि.०८: केवळ मानवी जीवनच नव्हे तर “स्त्री” शिवाय अवघे जगचं अपूर्ण आहे. इतरांच्या सुखासाठी ती आयुष्यभर तडजोड करते. कुटुंबाच्या प्रगतीशिल वाटचालीसाठी आजीवन झटते. स्वतःच्या भाव-भावनांना तिलांजली देऊन परपरिवाराच्या सुखासाठी अविरत श्रम करते. आई, आजी, पत्नी, बहीण, मुलगी व आदर्श गृहिणी अशा अनेकविध भूमिका बजावनारी आमच्यासाठी राबराब राबणारी खऱ्या अर्थाने ‘माता’ हे विशेषण पात्र ठराविणारी आजची महिला कोणत्याही क्षेत्रांत आघाडीवरच दिसते. मात्र असे असतानाही केवळ ८ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने तिचा सन्मान न करता तिच्या अपार त्याग आणि कष्टासाठी अविरत तिला सन्मान व योग्य आदर मिळावा, अशी स्पष्ट भावना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. मानसी परब यांनी व्यक्त केली.
कुडाळ शहरात विविध ठिकाणी पोटाची भूक शमविण्यासाठी अत्यंत कष्टातून संसार चालवणाऱ्या अलका दशरथ कलकुटे, दीपश्री देविदास तवटे, समीक्षा राव, मोहिनी मोहन शृंगारे, सविता चव्हाण या लघु उद्योजिका तसेच कुडाळ शहरातील यशस्वी महिला उद्योजिका सुनेत्रा विक्रांत भोगटे यांचाही सन्मान करण्यात आला.
दरम्यान यावेळी सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. महादेव परब यांच्या पशुधन विकासाच्या कार्यात सातत्याने महत्वाची साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती तथा सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व परफेक्ट अकॅडेमीचे संचालक प्रा. राजाराम परब यांच्या आई सौ. पार्वती महादेव परब यांचाही ‘आदर्श माता’ म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला.पोलीस बांधवांचाही केला सन्मानदरम्यान आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन, सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने कुडाळ पोलीस स्टेशन येथे उपस्थित उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कांबळे, पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम, पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश कऱ्हाडकर यांनाही पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कुडाळ येथील कष्टकरी,जिद्दी माता-भगिनींचा सन्मान..

