Site icon Kokandarshan

शिवजयंती निमित्त जि.प.पू. प्रा.शाळा सावंतवाडी नं.४ च्या विद्यार्थ्यांचे राजवाडा परिसरात विविध कार्यक्रम..

सावंतवाडी,दि.१९: शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. (४) चार च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खासकीलवाड्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शाळेपासून राजवाड्यापर्यंत भव्य रॅली काढली.
दरम्यान विद्यार्थ्यांनी राजवाडा परिसरात विविध कार्यक्रम सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली.
यावेळी सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांना भेट देत त्यांचे कौतुक केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ध्रुवसिंग पावरा, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष तळवणेकर, आदि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version