Site icon Kokandarshan

शिवजयंतीचे औचित्य साधून कलंबिस्त येथे भव्य रक्तदान शिबीर

सावंतवाडी,दि.१५: स्वराज्य रक्षक युवक मंडळ, कलंबिस्त – गणशेळवाडी व ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत स्वराज्य रक्षक युवक मंडळ, कलंबिस्त – गणशेळवाडी (शिवाजी स्मारक) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरास जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान रक्तदानासाठी येणार्‍या रक्तदात्यांनी रविकमल सावंत (९५२७९६९९९६), दिपक सावंत (७५८८९२९७२८), प्रल्हाद तावडे (९४२२५८४४३०), सचिन सावंत (८७६७३५८४६४), चेतन सावंत (९३७०५००३५४), रविंद्र तावडे (९४२१३७१४८३) तसेच ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर, खजिनदार सिद्धार्थ पराडकर व सचिव बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वराज्य रक्षक युवक मंडळ, कलंबिस्त – गणशेळवाडी व ऑन काॅल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version