सावंतवाडी,दि.६: येथील प्रसिद्ध सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या पालकांनी पालकांसाठी ठरवलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे पाककला स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. यावर्षी या स्पर्धेत एकूण २१ पालकांनी सहभाग घेतला या स्पर्धेचा विषय पारंपारिक पाककृती असा होता. पालकांनी विविध पारंपारिक पदार्थांची उत्तमरीत्या मांडणी केली. यामध्ये प्रथम क्रमांक- मेधा पालकर, द्वितीय- स्नेहल कोरगावकर ,तृतीय- अपर्णा गावडे, उत्तेजनार्थ-उमा बांदेकर, उत्तेजनार्थ- मिरा गीरप यांनी क्रमांक पटकावले. या सर्वाना सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पैइ यांनी स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. यावेळी व्यासपीठावर कळसुलकर हायस्कूलचे माजी प्राचार्य श्री मानकर, कळसुलकर हायस्कूलचे प्रभारी प्राचार्य श्री.भुरे, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत सर तसेच प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक पालक,विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन मुख्याध्यापक यांनी स्वागत केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन सौ. मानसी पालव, श्रीमती मनीषा सावंत यांनी सहकार्य केले. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात पालकांचा सक्रिय सहभाग असला पाहिजे यासाठी असे उपक्रम नियमितपणे व्हायला हव्यात असे गौरोद्गार शैलेश पई यांनी काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योत्सना गुंजाळ यांनी तर आभार प्रदर्शन श्री.डी.जी. वरक यांनी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सावंत सर, शिक्षक डी.जी. वरक, अमित कांबळे, ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ, संजना आडेलकर, स्मिता घाडीगावकर या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.
कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये पालकांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन
