Site icon Kokandarshan

धवडकी येथील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद..

शिबिरात ३५ दात्यांनी केले रक्तदान..

सावंतवाडी, दि.३०: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माडखोल धवडकी येथे विनेश तावडे व अमित राऊळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करीत प्रजासत्ताक दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

माडखोल धवडकी शाळेत घेण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, माडखोल सरपंच श्रुश्नवी राऊळ, उपसरपंच कृष्णा राऊळ, दत्ताराम कोळमेकर, माजी सरपंच संजय लाड, माडखोल धवडकी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला गावडे, संतोष राऊळ, अर्जित पोकळे, प्रकृती हॉस्पिटलचे डॉ. नीलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिता राऊळ,संजय देसाई,समृद्धी शिरसाट,दीप्ती राऊळ, सावंतवाडी रक्तपेढीच्या डॉ. सौ. बागेवाडी, टेक्निशन सौ. रेडकर, अनिल खाडे, पोलीस पाटील उदय राऊत, संजय राऊळ, प्रकाश मुरकर, लक्ष्मण बरागडे, नम्रता पानोळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version