Site icon Kokandarshan

देवसू गावचे सुपुत्र सत्यजित सावंत यांचा सन्मान

उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल कोल्हापूर वनखात्याच्यावतीने गौरव

सावंतवाडी,दि.२८: तालुक्यातील देवसू गावचे सुपुत्र तथा सावंतवाडी वनविभागाचे लेखापाल सत्यजित सावंत यांच्या सर्वोत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वन खात्याच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात लेखापाल सत्यजित सावंत यांना सन्मानित करण्यात आले.
वन विभागातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात येतो. सन २०२४-२५ या वर्षात सावंतवाडी वन विभागात लेखापाल सत्यजित सावंत यांच्या सर्वोत्कृष्ट प्रशासकीय सेवेची दखल घेऊन यावर्षी त्यांची सावंतवाडी वन विभागातून निवड करण्यात आली होती. यावेळी कोल्हापूर विभागीय वन खात्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
लेखापाल सत्यजित सावंत यांनी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मानव – वन्यजीव संघर्ष प्रकरणी विविध प्रस्ताव, भारतीय वन अधिनियम १९८० अंतर्गत महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य मार्ग रस्ते, गॅस पाईपलाईन तसेच ऑप्टिकल फायबर लाईन, लघुपाटबंधारे खात्याकडील विविध धरणांचे सुमारे पंधरा प्रस्ताव शासनास सादर करून त्यास मंजुरी घेण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. तसेच वनखात्याची महत्त्वाची व इतर कामे प्रामाणिकपणे वेळीच पूर्ण करून जनमानसात वन विभागाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य केल्याची दखल घेऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला.
सत्यजित सावंत हे गेली अनेक वर्षे वनविभागात कार्यरत असून उत्कृष्ट सेवा बजावत आहेत. त्यांच्या देवसू गावाच्या परिसरातील सामाजिक अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय कार्यामध्ये सहभाग असतो. त्यांच्या प्रशासकीय सेवेची दखल घेत वनखात्याच्यावतीने सन्मान झाल्याबद्दल लेखापाल सत्यजित सावंत यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version