Site icon Kokandarshan

सावंतवाडीत ६ एप्रिल रोजी डिजीटल मिडियाचे महाअधिवेशन : राज्य अध्यक्ष राजा माने

सावंतवाडी,दि.२८: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महा अधिवेशन सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात ६ एप्रिल रोजी होणार असून राज्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या अधिवेशनासाठी निमंत्रित केले आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून ३ हजार हून अधिक संपादक पत्रकार उपस्थित राहणार असून या महा अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तर सहस्वागत अध्यक्षपदी डॉ. अच्युत भोसले हे राहणार आहेत, या ऐतिहासिक तिसऱ्या महा अधिवेशनाच्या संयोजक पदाची जबाबदारी संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर यांच्यावर सोपवली असल्याची माहिती राजा माने यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली.
या महाअधिवेशनासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले ,आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे,माजी मंत्री व सिंधुदुर्ग चे आमदार दीपक केसरकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आल्याचेही सांगितले.

Exit mobile version