Site icon Kokandarshan

जि.प.पू.प्रा.शाळा शिरशिंगे नंबर (१) एकचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात संपन्न..

गावचे सरपंच दीपक राऊळ व प्रमुख गावकर विठ्ठल राऊळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे करण्यात आले उद्घाटन..

सावंतवाडी, दि.२९ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरशिंगे नंबर एकचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन समारंभ गुरुवारी २६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरशिंगे गावचे प्रथम नागरिक सरपंच दीपक राऊळ व गावचे प्रमुख गावकर विठ्ठल राऊळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग राऊळ, उपसरपंच सचिन धोंड, पोलीस पाटील गजानन राऊळ, मुख्याध्यापिका सोनटक्के मॅडम, पालक शिक्षक संघ, शाळेतील शिक्षक वृंद आदी गावातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
मुलांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गावातून मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version