सावंतवाडी,दि.२३: हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज पाळणेकोंड धरण येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती कल्पवृक्ष स्मारकाची पुनर्बांधणी करण्यात आली.
दरवर्षी जयंती उत्सवानिमित्त सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व नगरसेवक यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन केले जाते.
मात्र या ठिकाणी सावंतवाडी नगर परिषदेचा नवीन पाणी पुरवठा फिल्टरेशन प्लांट होत आहे.त्यामुळे सदर जागा बाधित होत असल्याने पर्यायी दुसऱ्या ठिकाणी आज बाळासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवीन पाच कल्पवृक्षांचे रोपण करून नवीन स्मारक उभारण्यात आले आहे.

