Site icon Kokandarshan

कीर्तनकारांची निंदा नालस्ती करणाऱ्या भजनी बुवा विनोद चव्हाण यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने केला जाहीर निषेध..

विनोद चव्हाण यांनी कीर्तनकारांची माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईची मागणी..अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज

कणकवली,दि.१८: वारकरी आणि हरी भजन परायण याची महाराष्ट्राला फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा आदर समाज करत आला आहे. असे असताना एका डबलबारी भजनाच्या कार्यक्रमात भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी ह. भ. प. ही कीर्तनकारांना दिलेल्या उपाधीचा चुकीचा अर्थ सांगून कीर्तनकारांना अश्लील पद्धतीने शिवीगाळ केलेली आहे.इतकेच नव्हे तर कीर्तनकारांची खिल्ली उडवलेली आहे. अशा या विनोद चव्हाण नावाच्या भजनीबुवाचा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत. विनोद चव्हाण यांनी हरी भजन पारायण करणाऱ्या सर्व कीर्तनकारांची जाहीर रित्या माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात कायदेशीर रित्या कारवाई केली जाईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे
अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी दिला आहे.
कार्याध्यक्ष संतोष राऊळ, सचिव गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर,उपाध्यक्षपदी राजू राणे, रामचंद्र कदम या वारकरी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांनी भजनी बुवा विनोद चव्हाण यांचा जाहीर निषेध करतानाच अशा पद्धतीचे वक्तव्य करून कीर्तनकारांवर टीका करण्याचा कोणताच अधिकार डबलबारीच्या भजनी सामन्यात भजनी बुवांना पोहोचत नाही. विनोद चव्हाण या भजनी बुवांनी केलेल्या चुकीचा कीर्तनकार आणि वारकरी जाहीर निषेध करत आहेत. दोन दिवसात भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी आपल्या वक्तव्य मागे घ्यावे आणि जाहीर रित्या माफी मागावी अन्यथा त्यांचेवर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात वारकरी संप्रदाय ठोसपणे भूमिका घेईल असा इशारा यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने दिला आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version