Site icon Kokandarshan

निगुडे नं.१ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे..

बांदा, दि.२८ : जि.प.पू.प्रा.शाळा निगुडे नं १ शाळेमध्ये ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम थाटात संपन्न झाले.तसेच विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाचे उदघाटन निगुडे गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री.लक्ष्मण निगुडकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले या प्रसंगी गावचे उपसरपंच श्री.गौतम जाधव,माजी सरपंच श्री.समीर गावडे,श्री जयराम गवंडे, माजी उपसरपंच श्री गुरुदास गवंडे, श्री.आपा गावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. नेहा पोखरे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.पं. सदस्य माजी सरपंच, उपसरपंच व शाळेतून सेवानिवृत्त शिक्षिका सौ उज्वला गावडे मॅडम यांचा शाळेच्या वतीने सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री नेमळेकर सर यांनी केला तसेच त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व उपशिक्षक श्री असनकर सर यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, विविध केंद्र व तालुकास्तरीय स्पर्धेत उज्वल यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन करण्यात आला.यावेळी शाळेतील मुलांनी वेशभूषा, नृत्य, गीतगायन,लोकनृत्य व कोकणातील माणसांच्या आपुलकीचा दशावतार नाटक असे वेगवेगळे कलागुण दाखवून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पांडुरंग होंडे सर यांनी केले.हे सर्व कार्यक्रम बसविण्यात शाळेच्या उपशिक्षिका सौ साक्षी समीर कोलते,शाळेची माजी विद्यार्थीनी ऐश्वर्या राणे,पालक रोहिणी गावडे आदींनी विशेष मेहनत घेतली.या कार्यक्रमांना गावातील तरुणाई,ग्रामस्थ,माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version