Site icon Kokandarshan

अखिल भारतीय मराठा महासंघाकडून राजमाता जिजाऊ राणीसाहेब यांची जयंती साजरी..

सावंतवाडी, दि.१२: येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज राजमाता जिजाऊ राणीसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली .
शिवरायांना राष्ट्र निर्मितीचे संस्कार देणाऱ्या जिजाऊ माँसाहेबांनी आपल्याला नेतृत्व, शौर्य आणि निःस्वार्थ सेवेतून प्रेरणा दिली. त्यांचं जीवन हे स्त्री सामर्थ्य आणि धैर्याचं प्रतीक आहे. जिजाऊंच्या विचारांना आणि कार्याला प्रणाम करत, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
आज पासून १९ फेब्रुवारी शिवजयंती पर्यंत संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा जोडो अभियान राबविण्यात येणार आहे यासाठी तालुक्यातील सर्व मराठा बांधवांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत,पुंडलिक दळवी,प्रसाद राऊळ,मनोज घाटकर,विशाल सावंत,बाळकृष्ण नाईक,संजय लाड,आनंद नाईक,दिगंबर नाईक,अभिजित सावंत,आनंद आईर ,त्रिविक्रम सावंत, सुमन राऊळ,मनवा सावंत आदी मराठा समाजबांधव उपस्थित होते.

Exit mobile version