Site icon Kokandarshan

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “रेझिंग डे” सप्ताहाच्या अनुषंगाने उद्या सावंतवाडीत प्रदर्शन..

सावंतवाडी,दि.०७: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “रेझिंग डे” सप्ताहाच्या अनुषंगाने पोलीस दलाची व पोलीसांच्या कामकामाजाची नागरिकांना माहिती होण्याकरीता ६ ते ८ डिसेंबर दरम्यान कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या ठिकाणी तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.

प्रदर्शनाच्या उद्या तिसऱ्या दिवशी सावंतवाडी येथील जगन्नाथ भोसले उद्यान येथे सकाळी १० ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रदर्शन ठेवण्यात आले आहे.
यामध्ये उपरोक्त प्रदर्शनात श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर गुन्हे सुरक्षा, सागरी सुरक्षा, अग्निशस्त्रे, फॉरेन्सीक युनिट, महिला सहाय्य, वाहतूक नियमन व नियंत्रण, पोलीस दलाची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

तरी, सदर प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरीक व विद्यार्थी यांनी भेट देवून प्रदर्शनातून माहिती घेण्याचे आवाहन सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी केले आहे.

Exit mobile version