Site icon Kokandarshan

कणकवली येथे होणार भाजपच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा भव्य नागरी सत्कार

कणकवली,दि.२१: राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा भाजपा कडून करण्यात येत आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात मंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार केला जाणार असून, जिल्हा भाजपाच्या वतीने होणाऱ्या या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. या स्वागताच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात जागोजागी मंत्री नितेश राणे यांच्या स्वागताचे भले मोठे बॅनर लागले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने रुग्णालयासमोरील मैदानावर जाहीर नागरी सत्कार केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री नितेश राणे यांचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार असून, या स्वागतसाठी कोणतीही कसूर राहू नये यासाठी भाजप महायुतीचा कार्यकर्ता सक्रिय झाला आहे.भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नेत्र दीपक असा हा सत्कार सोहळा करण्याचे नियोजन आहे. कणकवली शहरात या स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी स्वागत कमानी देखील उभारल्या जाणार आहेत. तर उपजिल्हा रुग्णालया समोर पासून शहरात जागोजागी भाजपाच्या झेंड्यांनी वातावरण भाजपमय केले जाणार आहे. महायुती मधील घटक पक्ष देखील या स्वागत सोहळ्यास सहभागी होणार आहेत.

Exit mobile version