Site icon Kokandarshan

वेर्ले येथील माजी सैनिकांकडून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा करण्यात आला सत्कार..

सावंतवाडी, दि.२८: तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वेर्ले गावातील माजी सैनिकांकडून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील सैनिक सैनिक भवनात माजी सैनिक संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
दरम्यान माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण राऊळ यांनी सर्व माजी सैनिकांना मार्गदर्शन केले, आणि यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी माजी सैनिक संघटने कडून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
वेर्ले हा गाव सैनिकांचा गाव म्हणून प्रसिद्ध आहे. गावात जवळपास २४९ माजी सैनिक आहे अशी माहिती मोरजकर यांनी दिली.

FacebookTwitterEmailWhatsAppShare
Exit mobile version