Site icon Kokandarshan

टी.बी. मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळ्यात शिरशिंगे ग्रामपंचायतचा सन्मान..

जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींना पुरस्काराचे वितरण

सावंतवाडी, दि.१४: जिल्हा परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने “टिबी मुक्त अभियान” मध्ये शिरशिंगे गावाला क्षय मुक्त गाव म्हणून घोषित करून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्ह्याधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते शिरशिंगे गावाच्या वतीने सरपंच दिपक राऊळ, यांनी पुरस्कार स्विकारला.
यावेळी उपसरपंच सचिन धोंड,आरोग्य सेवक वावराळे,जनसमुदाय आरोग्य अधिकारी कु. सावंत, उपस्थित होते.

क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असला तरी तो औषधोपचाराने पूर्णत: बरा होतो. नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधोपचार सुरू करावा. त्वरित निदान आणि योग्य औषधोपचारामुळे क्षयरोग पूर्णपणे बरा होत असल्याने सर्वांनी यासाठी प्रयत्न करुन सिंधुदुर्ग जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.

टी.बी. मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण सोहळा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, किशोर काळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी आदी उपस्थित होते. जिल्हा क्षयरोग मुकत्‍ करण्यासाठी ‘टीबीमुक्त ग्रामपंचायत’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात निकषापुसार जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त ठरल्या. या ग्रामपंचायतींना आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले की, जिल्हा क्षयरोग मुक्त्‍ करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत’ उपक्रमाला जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला. क्षयरोगाचा प्रसार थांबवता येतो पण त्यासाठी अशा रुग्णांचे त्वरित निदान करुन औषधोपचार देऊन त्यांना रोगमुक्त करणे आणि त्यांच्यापासून समाजात पसरणारा क्षयरोग थांबवणे हे महत्वाचे पाऊल ठरते. यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपला जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याच्या मोहिमेत आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका तसेच गांवकऱ्यांचा सहभाग महत्वाचा आहे असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात डॉ धुरी यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींपैकी ७० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. या स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबीमुक्त्‍ असल्यास कांस्यपदक, दुसऱ्या वर्षी टीबीमुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टीबीमुक्त राहिल्यास सुवर्णपदक देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

टी.बी. मुक्त ग्रामपंचायत

देवगड तालुक्यातील ग्रामपंचायती – बुरंबावडे, कातवण, पावनाई, वानिवडे

कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायती- आवळेगांव, गिरगांव-कुसगांव, हिर्लोक, माड्याचीवाडी, पणदुर,

पोखरण-कुसबे, वाडीवरवडे

दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायती- कोलझर, कुडासे, तळकट, मणेरी, आडाळी, कळणे, मोरगांव, सासोली, पाट्येपुर्णवसन सासोली खुर्द, घोटगे, खोकल, मोर्ले, पिकुळे, तेरवणमेढे, उसप, विर्डी, माटणे

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायती- आंबोली, गेळे, केसरी-फणसवडे, पारपोली, शिरशिंगे, कुरतडकरटेंब, वाफोली, पाडलोस, आरोस, भालावल, डिंगणे, गुळदुवे, निरवडे, ओटवणे, पडवे-माजगांव, रोणपाल व वेत्ये

कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायती- असलदे, भिरवंडे, गांधीनगर, शिडवणे व वायंगणी

मालवण तालुक्यातील ग्रामपंचायती- शिरवंडे, हिवाळे, हेदुळ, असगणी, वराड, आमडोस, बांदिवडे बु, आडवली, मिर्याबांदा, पेंडुर खरारे व तिरवडे

वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायती- अणसुर, चिपी, मोचेमांड व परबवाडा

वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायती- आचिर्णे, आखवण/भोम, कुंभवडे, मौंदे व तिथवली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Exit mobile version