Site icon Kokandarshan

वैभववाडी न. पं. मधील उबाठाचे नगरसेवक रणजीत तावडे यांचा भाजपात प्रवेश

विधानसभा निवडणुकीनंतरही आमदार नितेश राणे यांचा वैभववाडीत उबाठा सेनेला दे धक्का

वैभववाडी,दि.१०: वाभवे – वैभववाडी नगरपंचायतचे उबाठा सेनेचे नगरसेवक आणि वाभवे विकास सोसायटी चे व्हॉइस चेअरमन रणजित हरिचंद्र तावडे, यांनी बाबा तावडे,अभिजित तावडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
रणजित तावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीत उबाठा चा एकच नगरसेवक शिल्लक राहिला आहे.तावडे यांच्या भाजप प्रवेशाने उबाठा सेनेला फार मोठा धक्का आमदार नितेश राणे यांनी दिलेला आहे.
आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज ओम गणेश निवासस्थानी भारतीय जनता पार्टीत हा पक्ष प्रवेश पार पडला. आम. नितेश राणे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. नगरसेवक रणजित तावडे यांच्या भाजपा प्रवेशानंतर उबाठा गटाचे वैभववाडी नगरपंचायत मधील अस्तित्वच संपुष्टात आले आहे.
वाभवे – वैभववाडी नगरपंचायत मधील प्रभाग क्रमांक १६ मध्ये रणजीत तावडे हे नगरसेवक पदावर निवडून आले होते. रणजीत तावडे, बाबा तावडे, अभिजीत तावडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, नगरसेवक प्रदीप रावराणे,भाजपा तालुका उपाध्यक्ष स्वप्निल खानविलकर,श्री सुतार व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version