Site icon Kokandarshan

सावंतवाडीत तालुका पत्रकार संघाच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न

२५ पत्रकारांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ

सावंतवाडी,दि.०९ : येथील तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज पार पडलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिरात २५ हून अधिक पत्रकारांनी लाभ घेतला.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढला असून या ठिकाणी विविध उपक्रम रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आले आहेत ही बाब अत्यंत अभिमानाची असून रुग्ण संख्या वाढत आहे व उपचाराच्या मोड्युलर आय सी.यु सारख्या सुविधाही उपलब्ध झाल्या असल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश चौगुले यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रजनाने जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते झाले यावेळी आद्य पत्रकार बाळशाचे जांभेकर यांच्या प्रतिमेला अण्णा केसरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थितीत नवयुग एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष उदय भोसले,मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहकार्यवाह तथा युवा नाट्यकर्मी प्रवीण मांजरेकर, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्री रोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर ऐवाळे तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर, कार्यकारणी सदस्य मंगल कामत, दिव्या वायंगणकर, विजय राऊत, गुरु पेडणेकर, नरेंद्र देशपांडे,हर्षवर्धन धारणकर,मोहन जाधव, विश्वनाथ नाईक, अर्जुन राऊळ, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, प्रसन्न गोंदावळे, जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर गुरुदत्त कामत आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैद्यकीय अधीक्षक चौगुले यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने होत असलेल्या वाढी बद्दल माहिती दिली ते म्हणाले, बाह्य रुग्ण विभागामध्ये एक एप्रिल ते ऑक्टोबर अखेरपर्यंत ४९ हजार ९११ रुग्ण तपासणी तर आंतर रुग्ण विभागांमध्ये ४३८५ पेशंटांची तपासणी केली असून ७४२ गर्भवती महिलांची डिलिव्हरी करण्यात आली तसेच शस्त्रक्रिया ४७४ व अतिगंभीर शस्त्रक्रिया १२१७ या रुग्णालयामध्ये करण्यात आल्या आहेत . डायलेसिस ९८१ पेशंटवर उपचार सुरू असून आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत ३५२८ रुग्णांनी उपचार घेतला आहे व संसर्गजन्य सुमारे ५००० रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी किमान सहा महिन्यात तरी एकदा तरी तीस वर्षाहून अधिक वय असलेल्या पत्रकारांनी आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. पत्रकारांबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनी या तपासणी शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले दरम्यान वैनतेय पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाला चालना देण्यासाठी दत्तगुरु डेव्हलपर्सचे उदय भोसले यांच्यामार्फत वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी भेटून हा प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता तालुका पत्रकार संघ प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचेही सहकार्य घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच मळगाव येथे जत्रोत्सवात रात्री बारा वाजता जुगारावर धाड टाकून जुगाराचे साहित्य नष्ट करणाऱ्या धाडसी महिला मळगाव पोलीस पाटील प्रिया पार्सेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी त्यांनी मांडला.तर लवकरच तालुका पत्रकार संघातर्फे विविध स्पर्धा आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नुकतेच रुजू झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश चौगुले यांचे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरस्कर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सावंतवाडी तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. वेळोवेळी पत्रकारांच्या विविध कार्यक्रमांना प्रोत्साहित करणारे नवयुग एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष उदय भोसले यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सहकार्यवाह पदी निवड झाल्याबद्दल युवा नाट्यकर्मी प्रवीण मांजरेकर यांचा अण्णा केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गेली 25 वर्षाहून अधिक काळ स्त्रीरोग तज्ञ म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा देणारे स्त्रीरोगतज्ञ डॉ.ज्ञानेश्वर ऐवळे यांचा तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक उमेश तोरस्कर म्हणाले सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद असून इतर तालुक्यानी त्याचा आदर्श घ्यावा इतर तालुक्यातही अशा प्रकारचे आरोग्य तपासणी शिबिर घ्यावीत असे आवाहन केले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन नाईक म्हणाले, मराठी राज्य पत्रकार परिषद वर्धापन दिनानिमित्त असे उपक्रम घेते या उपक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातून आरोग्य शिबिरे घेण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी पत्रकार बंधू-भगिनींसह कुटुंबीयांसाठी पार पडलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला स्त्रीरोग तज्ञ डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील पारिचारिका रक्तपेढीतील कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मांजरेकर व मोहन जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन पत्रकार संघाचे सचिव मयूर चराटकर यानी केले.

Exit mobile version