Site icon Kokandarshan

कै महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित क्रिकेट स्पर्धेत महापुरुष गोठण विजेता

बाबा ११ उपविजेता तर पारिजात व पंढरीचा पांडुरंग तृतीय

सावंतवाडी,दि.०९: कै महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ संदिप सावंत मीत्र मंडळ व मधलाआवाट खासकीलवाडा आयोजित खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे विजेते पद महापुरुष गोठण संघाने तर उपविजेतेपद बाबा ११संघाने पटकावले.राजाराम गवस यानी उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले.
सेमी फायनल मध्ये पारिजात व पंढरीचा पांडुरंग संघाला तिसऱ्या क्रमांकावर राहवे लागले, अंतिम सामना महापुरुष गोठण व बाबा ११ यांच्यात झाला विपुल भिसे याची भेदक गोलंदाजी व राजाराम गवस यांच्या लाजवाब खेळीच्या जिवावर महापुरुष गोठण संघाने बाबा ११ संघाचा पराभव करुन विजेत्या चषकावर आपले नाव कोरले.
बक्षीस वितरणाच्या बोलताना प्रमुख पाहुणे सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे यांनी प्रत्येक खेळामधून एकोपा टीकून राहतो,एकोपा असने काळाची गरज आहे, प्रत्येकाने सकारात्मक उर्जा आपल्या शरिरामध्ये तयार करायला हवी त्यासाठी विचार सकारात्मक असने गरजेचे आहे असे सांगून मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी बंड्या ठाकूर यांच्या काकी सौ ठाकुर यांनीही आपले विचार मांडून मंडळाने एकोपा टीकवून ठेवण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेत सामनावीर म्हणून राजाराम गवस, मालिकावीर राजाराम गवस, उत्कृष्ट फलंदाज निखिल कांबळी, उत्कृष्ट गोलंदाज विपुल भिसे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ओंकार कुडतरकर यांना गौरविण्यात आले.संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन संदिप सावंत,व ओंकार कुडतरकर,मधला आवाट मित्रमंडळाने केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या व उपविजेत्या संघाला गौरविण्यात आले, यावेळी सीताराम गावडे, शिवशंभू विर्नोडकर,संजू राणे, प्रकाश राणे, गोपाळ राणे,भाई शिर्के बाबी ऊ,नाॅबर्ट माडतीस,अमीत भराडी,नाना भराडी,नंदू गावडे,वेंकी नाययर,संदिप सावंत,अनील कुडतरकर,ॲड पी डी देसाई,संतोष मळीक,अनील हवालदार,श्री गोपाळ ठाकुर,सौ ठाकुर,महेश डोंगरे,उमेश मठकर,दिनेश मठकर,अजीत सावंत,बाबू राणे,बाबी धुरी,अरुण घाडी,साई देशपांडे,आदि उपस्थित होते.

Exit mobile version