कणकवली,दि.०७: हिंदू धर्माला,देवदेवतांना आणि हिंदू धर्म ग्रंथांना मान्य असलेल्या संस्कृत भाषेतून आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेतली. आज विधिमंडळात झालेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी नितेश राणे यांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन एक वेगळा पायंडा घातला.
संस्कृत ही हिंदू धर्म धर्मग्रंथांनी स्वीकारलेली देववानी भाषा आहे. या भाषेत आमदार पदाची शपथ घेऊन नितेश राणे यांनी आपले वेगळेपण जपले आहे.
दरम्यान शपथ घेतल्यानंतर श्री राणे यांनी जय श्रीराम ची घोषणा दिली. हिंदूंचा बुलंद आवाज युवकांच्या गळ्यातील ताईत अशी नितेश राणे यांची छबी सगळीकडे महाराष्ट्रभर उमटत आहे.