Site icon Kokandarshan

शिरशिंगे गावच्या सुपुत्राची मानद लेफ्टनंट पदी नियुक्ती..

सावंतवाडी, दि.२७: तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात वसलेले शिरशिंगे हे गाव सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.
येथील बहुतांश तरुणांनी देश सेवेसाठी सैनिकात भरती होऊन, विविध पदे भूषवली आहेत.

याच गावचे सुपुत्र सुभेदार मेजर बापू शिवराम राऊळ यांची नुकतीच मानद लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली आहे. त्यांची झालेली ही बढती म्हणजे शिरशिंगे गावच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
श्री बापू राऊळ यांना लहानपणापासूनच सैनिकात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा होती, ते खेळात शेतकामात खूप हुशार होते. एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी मिळवलेले हे यश आत्ताच्या युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे.
त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version