Site icon Kokandarshan

कै महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घघाटन

बंड्या ठाकूर यांची उणीव मंडळाच्या कार्यकर्त्यांना सदैव भासेल-सीताराम गावडे

सावंतवाडी,दि.०७: संदिप सावंत मीत्र मंडळ व खासकीलवाडा मधला आवाट मीत्र मंडळ आयोजित कै महादेव ऊर्फ बंड्या ठाकूर यांच्या स्मरणार्थ खुल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,या स्पर्धेचे उद्घाशघाटन जेष्ठ नागरीक सुभाष मठकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले,
यावेळी प्रमुख पाहुणे सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे यांनी कै बंड्या ठाकूर यांच्या स्मृतिंना उजाळा दिला,बंड्या ठाकूर यांच्या निधनाने मधला आवाट मित्रमंडळात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरुन येणार नाही,बंड्या ठाकूर प्रत्येकाच्या हृदयात आहे असे गौरवोद्गार काढले.यावळी संजय राणे यांनीही या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुभाष मठकर सीताराम गावडे महेश डोंगरे भाई शिर्के संजय राणे ओमकार कुडतरकर संदीप सावंत बाळू वालावलकर प्रकाश राणे राजा सावंत यश कांग्राळकर ,दत्ता गवस ,प्रदीप मांजरेकर ,सौरभ नाईक ,राज देशपांडे ,रिशब देशपांडे, महेश राणे ,श्लोक सावंत ,मनीष नाईक अजित सावंत,आदि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version