Site icon Kokandarshan

वरवडे येथील मतदान केंद्रावर उमेदवार नितेश राणे यांनी बजावला मतदानाचा हक्क..माझ्यावर जनतेने टाकलेला विश्वास २३ तारीखला दिसेल.. श्री राणे

कणकवली,दि.२० : तालुक्यातील वरवडे फणसनगर येथील प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर कणकवली विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी आपल्या मतदानाचा हक्क आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बजावला.

विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासुन ते शेवटपर्यंत उत्साह पाहील्यानंतर मुंबईचे चाकरमानी असो किंवा या मतदार संघातील शेवटच्या गावातील मतदार असो. प्रत्येकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान केले आहे. हे आम्हा सर्वांना अपेक्षीत होत. जेवढे जास्त मतदान होते, तेवढा जास्त लोकशाहीचा विश्वास पक्का होतो. निश्चीतपणे २३ तारीखला त्यावर शिक्कामोर्तब झालेला असेल. माझ्यावर जनतेने टाकलेला विश्वास २३ तारीखला दिसेल, अशी प्रतिक्रिया आ.नितेश राणे यांनी दिली.
यावेळी प्रकाश सावंत, सोनु सावंत, सादीक कुडाळकर, ॲड. अभिजीत सावंत, संतोष पुजारे, अशोक राणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ.नितेश राणे म्हणाले, मला तर विश्वास आहे की, मतदानाचा उच्चाक वाढेल. मला समाधान वाटत की कानाकोपऱ्यातील आमचे कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढण्याचे काम केले. त्या कार्यकर्त्यांनी गावागावात बैठका घेवुन मेहनत घेतली आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. शेवटी एकच टप्यात ही निवडणुक होत आहे. मला समाधान वाटते की, ज्यासाठी असंख्य परिवारातील कार्यकर्त्यांनी गाववार बैठका घेवुन मतदानाचा हक्क बजावला, तसेच जास्तीत जास्त मतदान झालेले आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. लोकांची सेवा १० वर्ष प्रामाणिक मी करत आलेलो आहे. त्याची जाणीव मतदारांना आहे. माझ्या मतदार संघातील २६३ गावाचा विकास झाला पाहीजे, या हेतुने काम करत आहे. त्यांचा विश्वास मतदारानी दाखविलेला विश्वास २३ तारीखला पोहचेल. त्यामुळे मी पुर्णपणे समाधानी असल्याचे त्यांनी म्हटले.

Exit mobile version