नागरिकांनी दिला विजयी होण्यासाठी आशीर्वाद
कणकवली,दि.१८: येथील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ शहरातून शेकडो लोकांच्या उपस्थिती मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो लोक सहभागी झाले होते. यावेळी बाजारपेठ मध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत आमदार नितेश राणे यांनी आपण दहा वर्षात काय कामे केली याचा लेखाजोखा मांडला. यावेळी लोकांनी देखील आपण तुमच्या सदैव पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच प्रलंबित असलेली आणि आता सुरू केलेली कामे पूर्ण करून दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी पूढील पाच वर्षे साठी निवडून द्या त्या साठी कमळ निशाणी समोरील बटन दाबून मतदान करा असे विनम्र आवाहन नितेश राणे यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे , माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवासेना जिल्हाप्रमुख शिवसेना मेहुल धुमाळे, माजी नगरसेवक किशोर राणे, ऍड. विराज भोसले, अभी मुसळे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, अंकुश जाधव, माजी नगरसेवक संजय कामतेकर, माजी नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, कविता राणे, मेघा सावंत, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, ओमकार सुतार संदीप नलावडे नाईक, अवधूत तळगावकर, संजना सदडेकर, विजय इंगळे, निखिल आचरेकर, ओम राणे, राजा पाटकर, बंडू गांगण, दामू सावंत, एम. एम. सावंत, कल्याण पारकर, संदीप नाटेकर, प्रिया टेमकर, भाजप शहराध्यक्ष महिला प्राची कर्पे, संजीवनी पवार, सरिता राऊत आदी उपस्थित होते.